छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय स्टंटबेस्ड रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ आहे. या शो चा ११ व्या सीजनसध्ये टीव्हीवर धुमाकूळ घालत आहे. यात कलासृष्टीतले लोकप्रिय कलाकार कठीण स्टंट परफॉर्म करताना दिसत आहेत. हा शो सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. कलर्स वाहिनीवरील ‘खातरों के खिलाडी’चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस १४’ सीजनचे शत्रू हे रोमान्स करताना दिसत आहेत.

‘खतरों के खिलाडी ११’च्या येणाऱ्या भागात राहुल वैद्य आणि अभिनव शुक्ला एक स्टंट परफॉर्म करताना दिसतील. यावेळी त्या दोघांना एकमेकांच्या इतक्या जवळ यावं लागतं की ते किस करायचे बाकी राहतात. प्रेक्षकांना राहुल आणि अभिनव शुक्लामधील नात चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र स्टंट परफॉर्म करताना पाहायला मजा येणार आहे. या स्टंटमध्ये राहुल आणि अभिनवचं डोकं एका बॉक्समध्ये बंद करतात आणि त्यानंतर त्यात झुरळं सोडली जातात. या परिस्थितीत अभिनवला तोंडाने चावी उचलून राहुलकडे द्यायची असते. या दरम्यान राहुल बोलताना दिसतो की, “मी दिशा परमार (राहुल वैद्याची बायको)च्या एवढ्या जवळ आलो नसेन.” हा स्टंट परफॉर्म करताना मागून श्वेता तिवारीने “किती गोड स्टंट आहे हा…..” अशी कमेंट केल्याचे देखील या प्रोमोमध्ये दिसून आले. त्या दोघांचे मतभेद असल्याचे राहुल आणि अभिनव या दोघांनी शो सुरू होण्यापूर्वीचं स्पष्ट केलं होतं.

‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, अभिनव शुक्ला, आस्था गिल, महक चहल आणि निक्की तंबोळी सारखे सेलिब्रिटीज हे स्प्धक म्हणून सहभागी झाले आहेत. केपटाउनमधून या सर्व स्पर्धकांचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज देखील समोर आले होते. त्यांचे सर्व फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ‘खतरों के खिलाडी ११’ चे एपिसोड्स दर शनिवार-रविवार रात्री ९.३० वाजता कलर्सवर पहायला मिळतील.