अभिनेत्री कियारा अडवाणी आज तिचा वाढदिवसा साजरा करतेय. अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘शेहशाह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चांनी जोर धरलाय. अशातच आता अभिनेत्री कियारा अडवाणी कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राला कोणत्या नावाने हाक मारते याचा खुलासा केलाय.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकतंच त्याच्या सोशल मीडियावर हा खुलासा केलाय. सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत अभिनेत्री कियारा अडवाणी हिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या स्टोरीमध्ये त्याने लिहिलं की, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुझ्यासोबत शेरशाहमधला प्रवास खूपच शानदार राहिला. माझ्या कित्येक आठवणी आहेत. कायम असंच बिनधास्त रहा. खूप सारं प्रेम.” या इन्स्टा स्टोरीमध्ये सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटातला एक BTS फोटो देखील शेअर केलाय.

पहा फोटो: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का?; ‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलंलं नाव

(Photo-Instagram@Sidharth-malhotra)

अभिनेत्री कियारा अडवाणीन हिने सुद्धा सिद्धार्थची ही इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. ‘धन्यवाद कॅप्टन’ असं लिहित तिने तिने ही स्टोरी तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलीय.

पहा फोटो: Birthday Special : ‘प्रिती’चं हे घर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘What a Pretty House’

रूपेरी पडद्यावर अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच शानदार दिसून आली. त्याचप्रमाणे रिअल लाइफमध्ये सुद्धा त्यांच्या रिलेशनशीपबद्दलच्या चर्चा सुरू आहेत

 

अशी सुरू झाली लव्हस्टोरी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही गेल्या दोन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनाही एकत्र अनेकदा लंच आणि डिनर डेटवर असताना स्पॉट करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी न्यू ईअरचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघेही आफ्रिकेला गेले होते. यावर्षीच्या न्यू ईअरच्या सेलिब्रेशनसाठी ते दोघेही मालदीवला गेले होते. यावेळी ते दोघेही सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसून आले. इतकंच नव्हे तर या दोघांनी एकमेकांच्या पालकांची गाठभेट देखील केली असल्याचं बोललं जातंय.

१२ ऑगस्टला रिलीज होणार ‘शेरशाह’
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा ‘शेरशाह’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातील रिअल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारतोय. तर कियारा अडवाणीने त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांची भूमिका साकारलीय. हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येत्या १२ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.