Kiara Advani Sidharth Malhotra Diwali Celebration : यावर्षीची दिवाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी खूप खास होती. या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. कियाराने तिचा पती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिवाळीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या सेलिब्रेशनची झलक दाखवण्यात आली आहे.
कियारा अडवाणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने पिवळा अनारकली सूट घातला होता. कियाराने तिचा दिवाळी लूक अत्यंत साधेपणाने स्टाईल केला होता. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा पिवळ्या कुर्त्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “दिवाळीच्या शुभेच्छा, प्रेम, प्रकाश आणि सूर्यप्रकाश.” हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये कियाराच्या प्रेग्नेंसी ग्लोचे आणि जोडप्याच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत.
मुलीच्या जन्मानंतर कियारा आणि सिद्धार्थची पहिली दिवाळी
मुलीच्या जन्मापासूनच लोकांपासून दूर राहिलेली कियारा अलीकडेच तिचा पती सिद्धार्थबरोबर मुंबई विमानतळावर दिसली. चाहते या जोडप्याच्या छोट्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सर्वांमध्ये, सिद्धार्थने अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पितृत्वाबद्दल उघडपणे सांगितले की, “आमचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आहे… मग ते खाणे असो किंवा तिच्या झोपण्याच्या पद्धती असो. आम्ही आता उशिरापर्यंत जागे राहतो, पण हा एक वेगळाच थकवा आहे.”
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. या दोघांच्या चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडते. सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमध्ये मोठ्या थाटात पार पडले. दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आता दोघेही पालक झाले आहेत. त्यांना एक मुलगी आहे. १५ जुलै रोजी कियाराने एका मुलीला जन्म दिला. दोघांनीही अद्याप चाहत्यांना मुलीचा चेहरा दाखवलेला नाही.