Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य

विजय काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता.

Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य
विजय देवरकोंडा करण जोहरवर नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच विजय ‘लाइगर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या विजय या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. या चित्रपटात तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने अनन्यासोबत करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनीही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपितं उघड केली होती. पण आता विजय देवरकोंडा करण जोहरवर नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी जेव्हा विजय देवरकोंडाने करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरनं त्याला ‘चीज’ असं संबोधलं होतं. यामागे एक खास किस्सा आहे. जेव्हा जान्हवी आणि सारा अली खान यांनी करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी या दोघींनीही विजय देवरकोंडाला ‘चीज’ असं नाव दिलं होतं. त्यानंतर अनन्याने देखील ‘या चीज प्लॅटरवर मलाही जागा मिळेल का?’ असं वक्तव्य विजयच्या समोरच केलं होतं. हे अशाप्रकारचं नाव दिल्याने विजय नाराज असल्याचं एका व्हायरल व्हिडीओनंतर बोललं जात आहे.

आणखी वाचा- २ बायका, ४ मुलं अन् गायकाने उर्वशी रौतेलाला केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्री म्हणते…

विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात काही फोटोग्राफर त्याला याच ‘चीज’ कमेंटची आठवण करून देताना दिसतात. पण फोटोग्राफरच्या या बोलण्यावर विजय फारसा खुश असलेला दिसत नाही. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विजय देवरकोंडा करण जोहरवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता यात काहीच तथ्य नसल्याचंही समोर आलं आहे.

आणखी वाचा- “प्रमोशन संपल्यानंतर चप्पल…” व्हायरल व्हिडीओमुळे विजय देवरकोंडा होतोय ट्रोल

विजयच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफवांमध्ये तथ्य नाही. करण आणि विजय देवरकोंडा यांच्यात काहीच बिनसलेलं नाही. विजय सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि त्याच्या मते या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला खूपच अटेन्शन मिळत आहे आणि करणशिवाय शक्य झालं नसतं. करण जोहर त्याचा मार्गदर्शक आहे आणि ‘लायगर’च्या प्रमोशनमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने विजयला खूप मदत केली आहे. या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. एकमेकांसोबत काम करून ते खूश आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“४८ तासांपासून मी झोपलेलो नाही कारण…” आमिर खानने केला खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी