अभिनेता आणि स्वयंघोषीत चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके त्याच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतो. सिनेमा आणि बॉलिवूड कलाकारांवर टीका करणं आणि  भविष्यवाणी करणं यात केआरकेचा हातखंडा आहे. नुकतच केआरकेने एक ट्वीट करत करीना आणि सैफच्या मुलांची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाहद्दल भविष्यवाणी केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेने  ट्वीट करत आजवर अनेक भाकीतं केली आहेत. यात आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा नंबर आलाय. केआरके ने एक ट्वीट शेअर केलं असून यात तो म्हणाला, ” रणबीर कपूर आणि आलिया भट फारफार तर २०२२ च्या अखेरपर्यंत लग्न करतील. मात्र रणबीर कपूर लग्नानंतर १५ वर्षात तिला घटस्फोट देईल.”

हे देखील वाचा: ‘नावांमुळे सैफ आणि करीनाची मुलं यशस्वी अभिनेते होणार नाहीत’, अभिनेत्याने केली भविष्यवाणी

केआरकेने रणबीर आणि आलियाच्या घटस्फोटाची केलेली ही भविष्यवाणी त्यांच्या चाहत्यांना पचनी पडलेली नाही. त्यामुळे केआरकेच्या या ट्वीटवर त्याला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. एक युजर म्हणाला ” मग तू म्हणतोस की लोक मला शिव्या का देतात.”

तर दुसरा युजर म्हणाला, “तसं तुझं लग्न कसं झालं. नक्कीच गावी न पाहताच झालं असेल. कारण तिने तुला आधी पाहिलं असतं तर नक्कीच कधी लग्न केलं नसतं.”

हे देखील वाचा: “दिलीप कुमार यांनी अभिनयाशिवाय हिंदी सिनेसृष्टीसाठी योगदान दिलं नाही”; नसीरुद्दीन शाह यांचं मोठं विधान

केआरकेच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. या आधी देखील केआरकेला ट्वीट करणं अनेकदा महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी वेळोवेळी केआरकेची खिल्ली उडवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk predicted ranbir kapoor and alia bhat will getting married in 2022 and ranbir divorce her in 15 years tweet goes viral kpw