अभिनेत्री लारा दत्ताने बॉलिवूडमधून जरी ब्रेक घेतला असला तरी लारा सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. सोशल मीडियावर लारा कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. नुकताच एका चाहत्यांने लाराला सोशल मीडियावर सवाल केला होता. लसीसंदर्भात चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला लाराने हटके उत्तर दिलंय.
लाराच्या एका चाहत्याने नुकताच सोशल मीडियावर तिला एक प्रश्न विचारला. लारा दत्ताने लस घेतली का असा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर लाराने उत्तर देत काही सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. “होय..मी फोटो शेअर केला नाही याचा अर्थ असा नाही मी लस घेतली नाही.” असं उत्तर लाराने दिलंय. लाराच्या या उत्तरावर तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिली असून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
हे देखईल वाचा: लेकीने शेअर केलेला व्हीडीओ पाहून नीना गुप्ता म्हणाल्या “हे भगवान”!
Yes!!! Just because I didn’t post a picture doesn’t mean it didn’t happen!! https://t.co/AQqOY7npbH
— Lara Dutta Bhupathi (@LaraDutta) June 18, 2021
पहा फोटो: अफ्रिकेतील ‘सीशेल’ आयलँडवर सोनाली कुलकर्णीचं मिनीमून
गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी लस घेतली असून यातील काहींनी लस घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र काही सेलिब्रिटींनी लस घेताना असे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले की ज्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं. लसीकरण्याच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर अनेक मीम्सदेखील व्हायरल झाले होते.
लारा दत्ता लवकरच अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा २७ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय लारा ‘प्रोजेक्च २३’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसेल.