‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका रंजक वळणावर, नेहा आणि यशचा साखरपुडा लवकरच पार पडणार

या साखरपुड्यासाठी त्या दोघांनीही छान पारंपारिक लूक केला आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील मायरा म्हणजेच परी या चिमुकलीने सर्वांचीच मन जिंकली आहेत. मायरासोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेत आता लवकरच एक सुखद वळण पाहायला मिळणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच नेहा आणि यशचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे हा यशची भूमिका साकरत आहे. तर नेहाची भूमिका ही प्रार्थना बेहरे साकारत आहे. यातील यश आणि नेहाची केमिस्ट्री सर्वांना फार आवडताना दिसत आहे. सध्या या मालिकेत यश आणि नेहा हे आजोबांना परीबद्दल सर्व सत्य सांगण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे.

“हातात मशाल अन् डोळ्यात आक्रमकता…”, अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

तर दुसरीकडे सिम्मी ही काही ना काही कारस्थान करताना दिसत आहे. दरम्यान आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. नुकतंच या मालिकेत यश हा आजोबांना परीबद्दलचं सत्य सांगणार आहे. यानंतर आता या मालिकेत एक सुखद वळण पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत लवकरच नेहा आणि यश या दोघांचा साखरपुडा पार पडताना दिसणार आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो समोर येताना दिसत आहेत. यात यश, परी आणि नेहा हे तिघेही पाहायला मिळत आहे. या साखरपुड्यासाठी त्या दोघांनीही छान पारंपारिक लूक केला आहे.

“मी लायक आहे की नाही…”, अभिनेता गौरव मोरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान काही दिवसांपूर्वी या मालिकेतून प्रार्थनाने ब्रेक घेतला होता. प्रार्थना ही तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीसोबत लंडन गेली होती. त्यामुळे तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच नेहा ही या मालिकेत परतली आहे. त्यानंतर आता या मालिकेत एक सुखद ट्रक पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Majhi tujhi reshimgath serial prarthana behere neha shreyas talpade yash engagement nrp

Next Story
Bhirkit Trailer : राजकारण, कुटुंब अन्…; ‘भिरकीट’चा धम्माल विनोदी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी