Malaika Arora Break her Silence for Judge Clothes and Relationship : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने वयाच्या २५ व्या वर्षी अभिनेता अरबाज खानबरोबर लग्न केले. मात्र, १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मलायका रिलेशनशिप आणि तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मलायका तिच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल होते. त्याबद्दल एका मुलाखतीत ती बोलली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोराने तिच्याबद्दल मत मांडणाऱ्यांना उत्तर देताना म्हटले, “सुरुवातीला माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. कारण- लोक मला सांगायचे की, मी काय करावं आणि काय करू नये. माझं करिअर, माझ्या कपडे, माझी नाती या सर्व गोष्टींवरून मला जज केलं गेलं. जेव्हा मी स्वतःला स्पष्टीकरण देणे थांबवले तेव्हा मला मोकळे वाटले. तुम्ही स्वतःसाठी तयार केलेली कथाच महत्त्वाची असते.”

मलायकाने सांगितले की, लोक तिच्या नात्याबद्दल सतत बोलत असतात. ती अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्री म्हणाली, “लोक मला नेहमीच ‘खूप बोल्ड ‘ म्हणत आले आहेत.” ती अलीकडेच HYUE च्या नवीन कॅम्पेन ‘Own It’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. ती म्हणाली, “फॅशन असो, फिटनेस असो किंवा मी निवडलेला मार्ग असो, मी कधीही एक निश्चित फॉर्म्युला पाळला नाही. माझ्यासाठी खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही जगासाठी कामगिरी करणं थांबवता आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करता.” ती पुढे म्हणाली, “मी आयुष्यभर लेबल्स, टीका आणि अपेक्षांविरुद्ध लढले आहे. ‘Own It’ माझ्यासाठी फक्त एक टॅगलाइन नाही, तर ती माझ्या आयुष्याची एक खरी कहाणी आहे.”

मलायका अरोराने असेही सांगितले की, जेव्हा तिला स्वतःबद्दल खूप प्रश्न पडतात तेव्हा ती स्वतःवर शंका घेऊ लागते. अभिनेत्री म्हणाली, “स्वतःवर शंका घेणं हा मानवी स्वभाव आहे – तो कधीही जात नाही. असे बरेच दिवस येतात जेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारते, जसे इतर सर्व जण करतात.” मलायका अरोरा तिच्या फॅशन, आलिशान जीवनशैली, फिटनेस व नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.