अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी मलायका तिच्या फीटनेस आणि वैयक्तिक जीवणामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मलायकाला ट्रोल केले आहे.
आणखी वाचा : “लाज वाटत नाही का”, मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकीनी अवतार पाहून चाहते संतप्त
मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुप्लोने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका ग्लोइंग स्किनसाठी टिप्स देत आहे. मात्र, अनेकांना मलायकला ट्रोल केले आहे.
एक नेटकरी म्हणाला, “शेवटी एक फिल्टर आलाच”. दुसरा नेटकरी म्हणाला, “तरी ही तू म्हातारी दिसतेस.” तिसरा नेटकरी म्हणाला,” फेक फिल्टर क्वीन”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.
मलायका आधी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने तिच्या घराजवळ घर घेतल्याने मलायका चर्चेत आली होती. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका नेहमीच सोशल मीडियावर फीटनेस टीप्स देताना देते.