बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती सतत चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या ग्लॅमरस फोटोंसोबत मलायका तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. नुकताच मलायकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मलायकाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करायला पाहिजे हे सांगितलं आहे. मलायकाने या व्हिडीओत राखाडी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. मलायका नेहमीच योगाचे किंवा वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना फिट राहण्यासाठ टिप्स देताना दिसते.

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

आणखी वाचा : आराध्याचे नाव ठेवण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला लागले होते ४ महिने!

मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे म्हणजेच तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अर्जुनसोबत त्याच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केल्यामुळे मलायका सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora shows how to reduce belly fat with yoga dcp