अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं काही दिवसांपूर्वीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पती राज कौशल यांच्या जाण्यामुळे मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला आहे. अजूनही मंदिरा या दु:खातून सावरलेली नाही. या कठिण प्रसंगात आता मंदिरावर तिच्या कुटुंबाची देखील जबाबदारी आहे. कुटुंबाला सावरत अतानाच मंदिरा मात्र आजही आपल्या पतीच्या आठणींमध्ये गुंतली आहे. मंदिराने पती राज कौशल्या आठवणीत इन्स्टाग्रामवर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली आहे.
मंदिरा बेदीने रात्री उशीरा पतीच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटत एका टिश्यू पेपरवर ‘राजी’ असं लिहिल्याचं दिसतंय. तर फोटोच्या कॅप्शनमध्ये मंदिराने “मिस यू राजी” असं लिहित पुढे तुटलेल्या हार्टचं इमोजी दिलं आहे. मध्यरात्री केलेल्या या पोस्टवरून पतीच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला असून तिला झोप लागणं देखील मुश्किल झाल्याचं लक्षात येतय. मंदिराच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत दिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा: शनाया कपूरचा अफलातून बेली डान्स व्हायरल, बिग बींच्या नातीची भन्नाट कमेंट
मंदिरा बेदीची मैत्रिण आणि अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच काही फोटो शेअर केले होते. यात मंदिरा चांगलीच आनंदात दिसतेय. दोघींचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
राज आणि मंदिरा यांना दोन अपत्य
राज कौशल आणि मंदिरा बेदी हे दोघे गेल्या २५ वर्षापासून एकत्र होते. तीन वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. वीर असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. त्यांनंतर २०२० मध्ये एका मुलीला दत्तक घेऊन त्यांची कम्प्लीट फॅमिली तयार केली. त्यांचं कुटुंब आता आता सुख उपभोगत होतं, तितक्यात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पती राज कौशल यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं.