“काम नसेल तर…”, सुनील पालच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज वाजपेयीचं उत्तर

सुनील पालने मनोज वाजपेयीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

manoj-bajpeyee-sunil-pal
(Photo-Instagram@sunilpalcomedian/Manoj Bajpayee)

कॉमेडियन सुनील पालने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सुनील मनोज वाजपेयीला उद्धट आणि खालच्या पातळीची व्यक्ती म्हणाला होता. एवढचं नव्हे तर सुनील पालने मनोजच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा उल्लेख पॉर्न असा केला होता. यावर आता अभिनेता मनोज वाजपेयीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, “मला समजू शकतं लोकांकडे काम नाही. खरं तर मी ही गोष्ट चांगलीच समजू शकतो कारण मी देखील अशी परिस्थिती पाहिली आहे. मात्र अशा परिस्थितीत लोकांनी ध्यान करावं.” असं मनोज वाजपेयी म्हणाला.

हे देखील वाचा: Raj Kundra Case: “मला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं”; मॉडेल झोया राठोडचा खुलासा

सुनील पालने मनोज वाजपेयीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मनोज वाजपेयी कितीही मोठा अभिनेता असेल त्याला मोठे पुरस्कार मिळाले असतील मात्र त्याच्या एवढा उर्मट आणि खालच्या पातळीला गेलेला माणूस मी पाहिला नाही. त्याला देशातील कितीही मोठा पुरस्कार मिळाला असेल मात्र तो पॉर्न सारखा कंटेंट बनवतो.” असं सुनील पाल मनोज वाजपेजीबद्दल म्हणाला होता.

‘द फॅमिली मॅन’ बद्दल सुनील पाल म्हणाला…

‘द फॅमिली मॅन -२’ मध्ये श्रीकांत तिवारीची पत्नी सूचीचं अरविंदसोबत असलेल्या नात्यावर सुनीलने कमेंट केली होती. सूची आणि अरविंद नातं तसचं श्रीकांत तिवारीच्या मुलीचं कथानक यावर सुनील पालने आक्षेप घेतला होता.”पॉर्न फक्त दिसण्याने नसतो तर विचारांचा देखील असतो.” असं सुनील म्हणाला.

हे देखील वाचा: तेव्हापासून ऐश्वर्या राय सोनू सूदला ‘भाई साहब’ म्हणते…

गेल्या अनेक दिवसांपासून सुनील पाल इंडस्ट्रीपासून दूर आहे. सुनील पाल त्याच्या या विधानामुळे चर्चेत आला होता. एवढचं नव्हे तर राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातही त्याने काही खळबळजनक वक्तव्य केली आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Manoj bajpeyee responds to sunil pal on his comment gir ahuva insan kpw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी