बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयी सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मनोज ‘डायल १००’ या त्याच्या नवीन चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटमधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक गमतीदार किस्सा सांगितला आहे.
मनोज वाजपेयीने एका मुलाखतीत मुलींच्या कॉलेजमध्ये जातानां त्याची काय हालत व्हायची त्याबद्दल सांगितले आहे. मनोजने यापूर्वी अॅकटिंग इन्स्ट्रॅक्टर म्हणून काम केलं आहे. त्यावेळचा एक मजेदार किस्सा सांगताना त्याने एका मुलाखतीत सांगितले की, “मी एक लाजाळू व्यक्ती आहे. अल.एस.आर कॉलेज जे मुलींच कॉलेज आहे, तिथे आत जाणे मी टाळायचो आणि म्हणून मी एक दोन मुलींना सांगितलं होतं की तुम्ही गेट जवळ या जेणेकरून मला आत जावं लागणार नाही. एक दिवस त्या त्यांच्या नेहमीच्या जागी नव्हत्या म्हणून थोड्यावेळ ढाब्यावर वाट पहिली…आणि एक दिवस तर मी महिलांच्या लूमध्ये गेलो…तेवढ्यातचं काही मुली आल्या…त्या जाण्याचं नावच घेतं नव्हत्या, मग काय मी त्या मुली तिथून जाईपर्यंत मी तिथेच लपून बसलो.”
मनोज वाजपेयीचा बहुचर्चित चित्रपट ‘डायल १००’ झी ५ वर रिलीज झाला आहे. यातील त्याचा अभिनय पाहून त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाल्याचे दिसून येत आहे. तसंच मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सीरिज ‘फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या पर्वाची वाट देखील प्रेक्षक आतुरतेने बघत आहेत.