मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी सिद्धार्थने त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानंतर सिद्धार्थ जाधवने त्याला मिळालेल्या भेटवस्तूंबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच सिद्धार्थने एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने एका फोटोची फ्रेम शेअर केली आहे. ही फ्रेम त्याला फोटोग्राफर विनय राऊळ याने भेट म्हणून दिली आहे. या फोटोबद्दल त्याने त्याची एक आठवणही सांगितली आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

सिद्धार्थ जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट

“माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट.. #आपलासिध्दू
कुशल बद्रिके आणि मी एकपात्री अभिनय स्पर्धेत भेटलो तिकडून थेट देवेंद्र पेम सरांच्या “राम भरोसे” नाटकाच्या तालमीला गेलो.. तिथून सुरु झालेल्या मैत्रीचा प्रवास अजून सुरू आहे..कमाल एनर्जी, टायमिंग आणि माणूसपण अजून टिकवून ठेवलय माझ्या मित्राने…

कुशल आजही काळजी करतो माझी… भेट नाही झाली तरी कॉल वर कनेक्ट राहतोच आम्ही…
विनय राऊळ या मित्राने मला फ्लिमफेअर अॅवॉर्ड मिळाल्यावर काढलेला फोटो… फ्रेम करून दिला…हा पुरस्कार मी कुशल बरोबर स्विकारला.. माझ्या आयुष्यातला पहिला फ्लिमफेअर पुरस्कार…. दोघांचे डोळे.. त्यात असलेली स्वप्नं..विनयने अचूक टपलीत..स्वप्नं पूर्ण झाली की आनंद होतोच पण कुशल सारख्या मित्रा बरोबर झाली की आयुष्य सार्थकी लागतं.. I lv u विनय… kushal लव्ह यू forever bhava..,” असे सिद्धार्थ जाधवने म्हटले.

आणखी वाचा : “हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन् बक्षिसं घेऊन जातात…”, कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा ‘तो’ किस्सा

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा स्टार प्रवाहवरील आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. सध्या हा शो चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. यात त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवरही त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. तसेच लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share instagram post talk about kushal badrike nrp