सिद्धार्थ जाधव हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतदेखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो अनेकदा चर्चेत असतो. तर आता त्याने त्याची क्रश कोण, याचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स वेळोवेळी देत असतो. याचबरोबर अनेक मुलाखतींमधून देखील तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर आता अशाच एका मुलाखतीमध्ये त्याची पहिली क्रश कोण हे त्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “शाळेत असताना माझं कोणी क्रश वगैरे नव्हतं. माझ्या एकच ऑल टाईम क्रश आहेत त्या म्हणजे जुही चावला. त्या मला खूप आवडतात. त्या दिसायला छान आहेत, त्या रोमान्स छान करायच्या, त्या विनोदी छान करायच्या, त्या छान नृत्यही करतात. त्यामुळे मला जुही चावला प्रचंड आवडायच्या. म्हणून मला असं वाटतं की त्याच माझ्या क्रश असतील.”

हेही वाचा : आज लाखो रुपये मानधन आकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई होती ‘इतकी’ रुपये, खुलासा करत म्हणाला, “ते पैसे मी…”

सिद्धार्थचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तर आता त्याच्या या बोलण्यावर तसेच राहते विविध प्रतिक्रिया देत जुही चावलाचं काम आवडत असल्याचं सांगत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor siddharth jadhav revealed the name of his crush and explained the reason rnv