स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. पण आता त्याच्या कामाव्यतिरिक्त तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. हे कारण म्हणजे त्याचं व्हिजिटिंग कार्ड.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्निलने त्याच्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात ही ‘कृष्णा’ या मालिकेतून केली. त्यात त्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्याची ही भूमिका खूप गाजली. याच काळात त्याने त्याचं पहिलं व्हिजिटिंग कार्ड तयार केलं होतं. या व्हिजिटिंग कार्डचा फोटो आता सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे.

आणखी वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

दिग्दर्शक रामचंद्रन श्रीनिवासन यांनी ट्विटरवर स्वप्निलच्या कार्डचा एक फोटो शेअर केला आहे. या व्हिजिटिंग कार्डवर स्वप्निलचं नाव, पत्ता आणि त्याचे फोन नंबर लिहिलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “खूप वर्षांपूर्वी…तेव्हा प्रत्येक अभिनेता स्वतःचं व्हिझिटिंग कार्ड ठेवत होता. मला आठवतंय तरुण स्वप्निल जोशी त्याचं हे व्हिजिटिंग कार्ड सोबत घेऊन मला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला आला होता.” तर यावर स्वप्निलने देखील कमेंट करत जुन्या आठवणी जाग्या केल्या. त्याने लिहिलं, “द गुड ओल्ड व्हिजिटिंग कार्ड.” तर याबरोबर त्याने एक रेड हार्ट ईमोजी दिला.

हेही वाचा : Video: “शेवट कधीच सोपा नसतो…” स्वप्निल जोशीची भावूक पोस्ट, व्हिडीओ चर्चेत

त्याच्या व्हिजिटिंग कार्डचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हे त्याचं कार्ड पाहून त्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोवर त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत हे कार्ड आवडल्याचं सांगत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor swapnil joshi visiting card photo gets viral on social media rnv