Renuka Shahane : आपल्या मनमोहत हास्याने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेणुका शहाणेंना ओळखलं जातं. ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी त्यांची आणि माधुरी दीक्षितची जोडी डोळ्यासमोर उभी राहते. मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात २००१ मध्ये अभिनेते आशुतोष राणांशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
रेणुका शहाणे व आशुतोष राणा विविध कार्यक्रमांना तसेच एअरपोर्टवर वरचेवर पापाराझींसमोर एकत्र पोझ देताना दिसतात. पण, या दोघांच्या मुलांना फारसं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाहिलं जात नाही. काही दिवसांपूर्वीच एअरपोर्टवर रेणुका व त्यांच्या दोन मुलांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सर्वांना अभिवादन केलं. यावेळी अभिनेत्री व तिची दोन्ही मुलं पारंपरिक पोशाखात दिसत होती.
रेणुका शहाणेंच्या दोन्ही मुलांची नाव शौर्यमन राणा व सत्येंद्र राणा अशी आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचं दिलखुलास हास्य लक्ष वेधून घेत आहे. रेणुका, शौर्यमन व सत्येंद्र या तिघांनीही भारतीय परंपरेनुसार पेहराव केला होता. अभिनेत्रीची दोन्ही मुलं उंच आणि स्मार्ट आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत. नेटकऱ्यांनी या दोन्ही मुलांचा तसेच रेणुक शहाणेंचा साधेपणा भावला.
मुलांसाठी अनेक ऑफर्स नाकारल्या…
दरम्यान, रेणुका शहाणे अतिशय उत्तम अभिनेत्री असूनही, त्यांनी अतिशय मोजक्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. याबद्दल त्या सांगतात, “मला अनेक ऑफर्स येतात. पण, प्रत्येक प्रोजेक्टची निवड मी विचार करून करते. आमची मुलं आता मोठी आहेत त्यामुळे, त्या गोष्टीचं भान मला कायम असतं. जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा त्यांना माझी सर्वाधिक गरज होती. जेव्हा माझा मुलगा दहावीनंतर कॉलेजला जाऊ लागला तेव्हा खऱ्या अर्थाने मला वेळ मिळाला.”
रेणुका शहाणे आता पहिल्यांदाच महेश मांजरेकरांबरोबर ‘देवमाणूस’ सिनेमाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणार आहेत. हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असून यात महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd