‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. या मालिकेमध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूराणी यांची भूमिका साकारली होती. ही ऐतिहासिक मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता अमोल कोल्हे व प्राजक्ता गायकवाड ऐतिहासिक नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”
‘शिवपुत्र संभाजी’ असं या नाटकाचं नाव आहे. नाशिकमध्ये या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. यादरम्यानच त्यांनी नाशिकमधील प्रसिद्ध साधना मिसळला भेट दिली. इतकंच नव्हे तर अमोल कोल्हे यांनी तिथे जाऊन स्वतः जिलेबी बनवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
अमोल यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “२१ ते २६ जानेवारी नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य, मोदी मैदान (केला मैदान) साधुग्राम तपोवन, नाशिक येथे होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकला जाणं झालं तेव्हा नाशिक स्पेशल साधना मिसळला भेट देण्याचा योग आला.”
आणखी वाचा – ‘ठाकरे २’ चित्रपटाबाबत संजय राऊत यांचा खुलासा, म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो तर…”
अमोल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारेही चुलीवरच्या मिसळचा एक वेगळा अनुभव त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला. शिवाय त्यांनी पहिल्यांदाच जिलेबी बनवण्याचा आनंद व्यक्त केला. अमोल यांच्या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अमोल यांचं कौतुक केलं आहे.