अंकुश चौधरी(Ankush Choudhary), सई ताम्हणकर, भरत जाधव, अनिकेत वसंतराव, सई लोकूर, मनवा नाईक, क्रांती रेडकर असे अनेक लोकप्रिय कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आता १३ वर्षानंतर या चित्रपटाचा स्वीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय अभिनेता अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॅामेडी ॲाफ टेरर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३ वर्षानंतर ‘नो एंट्री पुढे धोका आहे’चा सीक्वेल येणार

निखिल सैनी फिल्म्स अँड एंटर टेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “मित्रपरिवार आणि साऱ्यांनीच माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार!गेली कित्येक वर्ष तुमच्याकडून मला मिळत असलेल्या या प्रेमाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज खास तुमच्यासाठी एक नवीन सिनेमॅटिक भेट घेऊन येतोय.” पोस्टरमध्ये अंकुश चौधरी स्टायलिश लूकमधील दिसत असून त्याच्या बाजूला दोन मुली दिसत आहेत. ज्या अर्ध्या मुलीच्या रूपात आहेत तर अर्ध्या रोबोटच्या रूपात आहेत. त्यामुळे या चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाविषयी गोष्टी पाहायला मिळणार असल्याचे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे. कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे.

चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी म्हणतात, “आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. चित्रपटाची टीम इतकी कमाल आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.”

दरम्यान, या चित्रपटात कोण कलाकार असतील, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush choudharys big announcement sequel of no entry pudhe dhoka aahey after 13 years marathi movie nsp