scorecardresearch

अंकुश चौधरी

अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. अंकुश चौधरीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९७३ रोजी झाला. अंकुशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तो सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. नंतर त्याने एकांकिका, स्पर्धा, नाटक आणि मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली.


अंकुशने केदार शिंदेबरोबर केलेल्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकाला खूप यश मिळाले होते. त्यात अभिनेत्री दीपा परबदेखील अभिनय करीत असे. याच काळात अंकुश व दीपा यांच्यातील जवळीक वाढली आणि जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगाही आहे. अंकुशचे गोपाळा रे गोपाळा हे नाटकदेखील खूप गाजले होते. तसेच १९९९ मध्ये अंकुशने ‘हसा चकट फू’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सून येता घरी या चित्रपटातून अंकुशची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. जिस देश में गंगा रहता है या गोविंदाच्या हिंदी चित्रपटातही अंकुशने छोटी भूमिका साकारली होती. सावरखेड एक गाव, आई शप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, संशयकल्लोळ, चेकमेट, गैर, ब्लफमास्टर दुनियादारी, दगडी चाळ, डबल सीट, क्लासमेट्स, धुरळा यांरख्या सुपरहिट चित्रपटांमुळे अंकुशला मराठीचा चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार, असे म्हटले जाते.


अंकुश हा मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुश ‘स्टार प्रवाह’वरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियअर्सचा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये अंकुशने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अंकुशची ही भूमिका खूप आवडली आहे. अंकुश आता ‘ऑटोग्राफ’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Read More
ankush chaudhari deepa chaudhari
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आईचं काम कसं वाटलं? अंकुश-दीपा चौधरीचा मुलगा म्हणाला “मला…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आईचं काम कसं वाटलं? दीपा चौधरीच्या लेकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मला…”

deepa chaudhari rohini hattangadi
अंकुश चौधरीची पत्नी रोहिणी हट्टंगडी यांना ‘या’ नावाने देते आवाज, म्हणाली “तिचा अनुभव…”

आता ती दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकणार आहे.

me-honar-superstar-jallosh-juniors-cha-winner
‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ : सई आणि शरयू ठरल्या विजेता, बक्षिसाची रक्कम जाणून घ्या

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ सई आणि शरयू यंदाच्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या.

baharla-ha-madhmaas-on-uk-radio
UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ गाणं पोहोचलं सातासमुद्रापार

madhumas song
Video: जपानी कलाकारालाही आवरला नाही ‘बहारला हा मधुमास’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, व्हिडीओ तुफान व्हायरल

विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्याने जपानच्या रस्त्यावर शूट केला आहे. या व्हिडीओवर केदार शिंदे, सना शिंदे आणि अंकुश चौधरीनेही प्रतिक्रिया…

avadhoot gupte
“आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष…,” अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट चर्चेत, ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल प्रतिक्रिया देत म्हणाला…

गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

amruta khanvilkar Maharashtra Shaheer
“अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही…” ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल पोस्ट केली आहे.

dipa
“फक्त त्याची बायको म्हणूनच नव्हे तर…,” अखेर अंकुश चौधरीची पत्नी दीपाने ‘त्या’ प्रश्नांवर सोडलं मौन; म्हणाली…

तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×