सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महेश यांच्यासह त्यांची पत्नी मेधा मांजरेकरही उत्तम अभिनेत्री आहेत. आता या त्यांच्या पाठोपाठ सई, सत्या व गौरी मांजरेकरही कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू इच्छित आहेत. सत्या मांजरेकर महेश यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीसह प्रसाद खांडेकरचा रोमँटिक डान्स, पण ‘या’ गोष्टीची सर्वाधिक चर्चा

आता महेश यांचा मुलगा सत्याने एक नवा व्यवसाय सुरू केला आहे. सत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या फोटोंमधून याबाबत माहिती दिली. सत्याने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं या हॉटेलचं नाव आहे. सत्याला नव्या व्यवसायासाठी सगळेच जण शुभेच्छा देत आहेत.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘सुका सुखी’ फ्रॉम दे मांजरेकरर्स किचन असा एक वेगळाच लोगो बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये सुक्या मच्छीचा आस्वाद सगळ्यांना घेता येणार आहे. सत्याची ही नवी सुरुवात खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय दुसरीकडे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी तो विशेष मेहनत घेत आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या जीममध्ये घाम गाळत आहे. त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचे बरेच व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director actor mahesh manjrekar son satya started his own hotel share photos on social media see details kmd