मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बहिणी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व गौतमी देशपांडे. मृण्मयी व गौतमी या दोघींचा मोठा चाहता वर्ग आहे. दोघींच्या कामावर जितकं प्रेक्षक वर्ग प्रेम करतात तितकंच दोघींच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ करताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृण्मयी व गौतमी नेहमी मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा या व्हिडीओमध्ये दोघी भांडताना दिसतात. सिब्लिंग्स डेच्या दिवशी मृण्मयीने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर मृण्मयीने आणखीन एक असा व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून गौतमी नाराज झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह प्रसाद ओक-मंजिरी ओकचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा बघाच

“लाड = आई = लाड, टूक टूक गौतू,” असं कॅप्शन लिहित मृण्मयीने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मृण्मयी म्हणतेय, “खूप जास्त दमल्यानंतर, खूप जास्त प्रमोशन्स, मुंबई-पुणे, मुंबई-कोल्हापूर, सांगली, असं कुठे-कुठे फिरल्यानंतर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज असते. तर हा आहे तो उपाय.” यानंतर मृण्मयी आईच्या हाताने डोक्याला तेल लावून घेताना दिसत आहे. हेच पाहून गौतमी नाराज झाली आहे.

मृण्मयीच्या या व्हिडीओवर गौतमीने नाराज असल्याचे इमोजी प्रतिक्रियेत दिलं आहे. ज्यावर मृण्मयीने हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.

हेही वाचा – “आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात ती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिने सुधीर फडके यांची पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. येत्या १ मेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसंच गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं ‘गालिब’ नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात तिच्यासोबतीला अभिनेता विराजस कुलकर्णी पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande upset after watching mrunmayee deshpande video pps