मराठीमध्ये सध्या नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशामध्येच आता आणखी एका नव्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये मराठीमधील नावाजलेल्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. तर स्वतः हेमंत ढोमेची झलकही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “लग्न करणं गरजेचंच आहे का?” श्री श्री रविशंकर यांना प्राजक्ता माळीचा प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “काही लोक लग्न करुनही…”

विशेष म्हणजे ‘दगडी चाळ २’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेते मकरंद देशपांडे यांची एक वेगळीच भूमिका या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘सातारचा सलमान’च्या ट्रेलरमध्ये मकरंद यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच प्रेक्षकांना हसवणारा हा चित्रपट आहे हे ट्रेलरमधून दिसून येतं.

पाहा ट्रेलर

ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतो. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

आणखी वाचा – “मी संन्यास घेतला नाही आणि…” श्री श्री रवी शंकर यांच्या आश्रमात गेली होती प्राजक्ता माळी, नेटकरी म्हणाले, “तू लग्न न करण्यातच…”

या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या ३ मार्चला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.