‘आप्पाचा विषय लय हार्ड आहे’, ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’, अशी अनेक गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. आता यामध्ये ‘तांबडी चामडी चमकते उन्हात’ (Tambdi Chamdi Song) या गाण्याचादेखील समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे. ‘तांबडी चामडी’ या गाण्याला कृणाल घोरपडेने म्हणजेच क्रेटेक्सने संगीतबद्ध केले आहे. नुकतीच त्याने बिग बॉस मराठी ५ च्या घरात हजेरी लावली होती. आता या निमित्ताने जाणून घेऊ या गाण्याची निर्मिती कशी झाली?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तांबडी चामडी’ हे गाणं कसं तयार झालं?

कृणाल घोरपडे ऊर्फ क्रेटेक्स आणि श्रेयस सागवेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘कलाकट्टा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी हे गाणं कसं तयार झालं आणि यामागची गोष्ट काय आहे. ‘तांबडी चामडी’ हे शब्द कसे सुचले? याबद्दल बोलताना श्रेयसने म्हटले, “याआधी मी गाणं लिहिलं होतं. त्यामध्ये या शब्दांचा वापर केला होता. मी एकदा गाडीवरून बाहेर जात होतो, तेव्हा उन्हामुळे त्वचेला चटके बसत होते. तेव्हा मी ‘तरी चेहऱ्यावरती तेज उगत्या सूर्यागत तांबडी चामडी गाडीवरती भाजत फिरते उघड्यावर’ अशी एक ओळ लिहिली होती. त्यावर क्रेटेक्सने मला त्याची बीट पाठवली होती. पुन्हा एकदा मी जेव्हा गाडीवर होतो, तेव्हा मला लक्षात आले की, माझी चामडी फक्त भाजत नाही, तर ती चमकतेयसुद्धा. त्यानंतर मी ‘तांबडी चामडी ही चमकते उन्हात लका लका लका’, ही ओळ लिहिली.

क्रेटेक्स याबद्दल सांगताना म्हणाला, “हे गाणं तयार करायचं, असं काही आमचं ठरलं नव्हतं. ही जी बीट हो,ती ती दुसऱ्यासाठी बनवली होती. एक अभिनेता होता, तर त्याच्यासाठी ती बनवली होती. पण, त्याच्या कामाच्या तारखांमुळे ते झालं नाही.” मी तोपर्यंत हे श्रेयसला पाठवलं आणि त्याला सांगितलं की, यात काही मराठी शब्द समाविष्ट कर. कारण- हे गाणं मराठीमध्ये येणार नव्हतं; दुसऱ्या भाषेत येणार होतं. तर मी श्रेयसला सांगितलं की, बहुभाषेत तयार करू. तर त्यानं मला लिहून दिलं आणि सांगितलं की, यामधील जे तुला वापरायचं आहे, ते वापर. तर त्यानं लिहून दिलेलं मला इतकं आवडलं की, मी त्या तिसऱ्या व्यक्तीला फोनच केला नाही. मला आधी वाटलेलं की, तांबडी चामडी हे शब्द लोकांना समजतील का? तर श्रेयसने सांगितलं की, हे शब्द आपणच निर्माण करू शकतो. ते पटलं मला.”

हेही वाचा: Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार, ट्रॉफी जिंकणार का? म्हणाले…

श्रेयस सागवेकरने हे गाणे लिहिले आहे. त्याच्या लिखाणाला मिळत असलेल्या प्रसिद्धीबद्दल तो म्हणाला, “ही खूप समाधानाची गोष्ट आहे. आपलं लिखाण समोरच्याबरोबर जुळतं, त्यावेळी छान वाटतं.”

दरम्यान, सोशल मीडियावर या गाण्याला मोठी पसंती मिळाल्याचे दिसले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How tambdi chambdi song created kratex and shreyas sagvekar revealed story behind it nsp