Mahesh Majrekar First Wife Deepa Mehta passed away : अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे निधन झाले आहे. महेश व दीपा यांचा मुलगा सत्या मांजरेकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून आईच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. कोकण हार्टेड गर्लने देखील दीपा मेहता यांच्या निधनाबद्दल पोस्ट केली आहे.
महेश मांजरेकर व दीपा मेहता यांचा घटस्फोट झाला होता. महेश व दीपा यांना सत्या मांजरेकर व अश्वमी मांजरेकर दोन अपत्ये आहेत. दीपा मेहता या फॅशन डिझायनर होत्या.
सत्या मांजरेकरने आई दीपा मेहता यांचा एक जुना फोटो स्टोरीमध्ये शेअर केला आहे. I miss you mumma असं त्याने फोटोवर लिहिलं आहे.
कोण होत्या दीपा मेहता?
महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. दीप मेहता या कॉस्चुम व फॅशन डिझाइनर होत्या. त्या क्वीन ऑफ हार्टस या साड्यांचा ब्रँड चालवायच्या. त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिनेविश्वातूनच नाही, तर बॉलीवूडमधूनही खूप मागणी आहे. दीपा व महेश यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. अश्वमीसुद्धा अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणामुळे महेश व दीपा यांचा घटस्फोट झाला. पण ही दोन्ही भावंडं आपल्या आईबरोबर राहायची.
महेश मांजरेकर यांनी दुसरं लग्न मेधा यांच्याशी केलं. मेधा मांजरेकर अभिनेत्री आहेत. मेधा व महेश यांना सई मांजरेकर नावाची मुलगी आहे. तीदेखील अभिनेत्री आहे.