Premium

“कर्नाटकचे उपमुख्यमंत्री टिपू सुलतानच्या थडग्यावर…”, डी.के.शिवकुमार यांचा फोटो पोस्ट करत शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “जेव्हा हिंदू लोक…”

शरद पोंक्षे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा फोटो पोस्ट करत शरद पोंक्षेंची पोस्ट

sharad-ponkshe-on-dk-shivakumar
शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक गोष्टींवर ते उघडपणे आपलं मत मांडताना दिसतात. शरद पोंक्षेंच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीची संपूर्ण देशभर चर्चा झाली. या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवत कर्नाटकात सत्ता स्थापन केली. २० मेला कर्नाटकचे नव्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांचा शपथविथी पार पडला. मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार यांनी शपथ घेतली. शरद पोंक्षेंनी डी.के.शिवकुमार यांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा>> “आमच्या चेतूच्या अंगात…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

“हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतानच्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले….काँग्रेस पार्टी उघडपणे इतकं सगळं करत असताना देखील जेव्हा हिंदू लोक यांना मत देतात…ह्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं?” असं शरद पोंक्षेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, शरद पोंक्षेंनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ते छोट्या पडद्यावरील ‘दार उघड बये’ या मालिकेत काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 10:24 IST
Next Story
“स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी…” अभिज्ञा भावेचे रिल स्टार, इन्फ्लुएन्सरला खुलं पत्र, म्हणाली “दुर्दैवाने माझ्या इंडस्ट्रीत…”