मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाच मी लेक गं’ या मालिकांमुळे मिताली घराघरांत पोहोचली. अभिनेत्री नुकतीच इंडोनेशियामधील बाली येथे फिरायला गेली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक बालीला भेट देत असतात. मितालीला सुद्धा विविध ठिकाणी फिरायला जायला प्रचंड आवडतं. सध्या तिचे बाली ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बॉलीवूड चित्रपटांच्या सेटवर भेदभाव होतो का?, शहनाज गिलने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मोठ्या कलाकारांना…”

बाली ट्रिपचे अनेक फोटो मितालीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बालीच्या समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून तिने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंना तिने “सनसेट सरफिंग” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत ‘कोहली फॅमिली’चं स्किट नव्या रुपात? नम्रता संभेरावच्या फोटोने वेधलं लक्ष

मितालीचा हा बोल्ड लूक पाहून नेटकरी मात्र काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे तिच्या फोटोंवर असंख्य कमेंट्स करण्यात येत आहेत. “तुला हे शोभत नाही”, “मराठी संस्कृतीचं वाटोळं करा”, “मराठी संस्कृतीमध्ये हे चांगलं दिसत नाही”, “तिकडेच राहा परत येऊ नकोस” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी मितालीच्या फोटोंवर केल्या आहेत. दुसरीकडे मितालीच्या काही चाहत्यांनी तिच्या बिनधास्त बोल्ड लूकचं कौतुक केलं आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या फोटोंवर करण्यात आल्या आहेत.

मिताली मयेकर

हेही वाचा : मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेणार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, अभिनेत्री मिताली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर नुकताच मितालीने तिचा वाढदिवस दुबई येथे साजरा केला. मिताली वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्धार्थ चांदेकरसह दुबईला गेली होती. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर जानेवारी २०२१ मध्ये सिद्धार्थ-मितालीने थाटामाटात लग्न केलं. या दोघांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mitali mayekar shared bold photos in bikini sva 00