Mrunmayee Deshpande Shared Funny Memories : मृण्मयी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘मनाचे श्लोक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.
मृण्मयी देशपांडे हिने ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन स्वत: केलं आहे. तिचा हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अशातच अभिनेत्रीने यानिमित्त नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने तिच्या खऱ्या आयुष्यात कांदे पोह्यांच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिला कांदे पोह्यांदरम्यान अनेक अनुभव आल्याचं म्हटलं आहे.
मृण्मयी याबद्दल म्हणाली, “मेट्री मोनी साईटवर माझं नाव नोंदवण्यात आलेलं. या सिनेमातला बराचसा भाग माझ्या आयुष्यावर आधारित आहे. मी मुलं बघत नव्हते म्हणून माझी आई माझ्यासाठी मुलं पाहत होती आणि त्यावेळी माझं लग्न हा तिच्यासाठी एकमेव विषय होता. इतकं ती या गोष्टीच्यामागे लागलेली आणि ज्या पद्धतीचे मुलांचे प्रोफाइल माझ्यापर्यंत आल्या, त्यावरून मला वाटलंच नाही की तिला मुलगा कोण, कसा आहे याच्याशी काही फार घेणं देणं होतं.”
मृण्मयी देशपांडेने सांगितले भन्नाट किस्से
मृण्मयी पुढे म्हणाली, “मी जेवढ्या मुलांना पाहिलंय त्या प्रत्येकवेळी अभिषेक खांडकेकर आणि सुखदा माझ्याबरोबर असायचे. आम्ही खूप घट्ट मित्र-मैत्रिणी आहोत, पण त्यावेळी खूप भेटीगाठी व्हायच्या, त्यामुळे माझी मुलांबरोबर मिटिंग झाली की मी लगेच त्यांच्या टेबलवर जाऊन बसायचे. एकदा मी एका मुलाला भेटायला गेले आणि त्याने मला पहिला प्रश्न विचारला की, मग होणार सून तू कुठल्या घरची. ते ऐकून मला धक्का बसला. तेव्हा मी काहीतरी कारण देऊन तिथून निघाले. मला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं की माझ्या आविर्भावावरून त्याला कळलं असेल की हे नाही होणार वगैरे, पण त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि तो पुढे गेल्यानंतर मी पुन्हा तिथेच अभिजीत आणि सुखदा बसलेले तिथे आले.”
मृण्मयी पुढे दुसरा किस्सा सांगत म्हणाली, “एकदा पुण्यात मी एका वेगळ्याच मुलाला भेटले होते. त्या मुलाने तर मला त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं म्हणून हो म्हटलेलं. तो एक पंजाबी मुलगा होता. तो आणि मी त्यावेळी फार बोरिंग गप्पा मारत होतो आणि तो पूर्ण वेळ फक्त करिअरबद्दलचे प्रश्न विचारत होता आणि हे सगळं होत असताना ज्या मुलाला मी आधी नकार दिलेला, ज्याने मला होणार सून तू कुठल्या घरची असा प्रश्न विचारलेला, तो तिथे एका मुलीबरोबर आला. तेव्हा मला असं झालं की मी कुठे लपू; पण टेबलाखालीसुद्धा जाऊ शकत नव्हते आणि मी ज्या मुलाबरोबर बोलत होते त्याला म्हटलं की आता आपण निघूयात, आपण माझ्या घरी जाऊन जेऊयात. तेवढ्यात तो आधी भेटलेला मुलगा काउंटरजवळ आला आणि माझी जी अवस्था झालेली त्याला पुन्हा पाहून, तशीच त्याची तेव्हा झाली आणि तो गांगारलेला.”
मृण्मयीने पुढे तिचा नवरा स्वप्नील रावला ती कशी भेटली याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “स्वप्नीलच्या बाबतीत वेगळं घडलेलं. आम्ही भेटलो तेव्हा पाहिल्याक्षणी प्रेमात पडलो आणि दुसऱ्या दिवसापासून एकत्र राहायला लोगलो. तो पण मला मराठी मेट्रो मोनीमार्फतच भेटला.”