अजय पूरकर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. अजय पूरकर यांनी या चित्रपटात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं. म्हणूनच अजय यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. अंबा घाटात निसर्गाच्या कुशीत अजय यांचं घर आहे. २५ एकर परिसरात अजय यांनी हे घर बांधलं आहे. अजय यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. घराच्या प्रशस्त हॉलमध्ये बसण्यासाठी बैठक व खूर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर हॉलमधील एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर पावनखिंड चित्रपटातील अजय यांनी साकारलेल्या बाजीप्रभू देशपांडेचा फोटोही हॉलमधील एका भिंतीवर लावण्यात आला आहे. हॉलमधील हा फोटो लक्षवेधी ठरत आहे.

हेही वाचा>> “आई शप्पथ…” शिव ठाकरेला एअर होस्टेसने लिहिली चिठ्ठी, ‘बिग बॉस स्टार’ म्हणाला…

घरातील किचन आणि बेडरुमची झलकही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अंबा घाटात वसलेल्या अजय यांच्या घरातील खिडकीमधून निसर्गरम्य दृश्यांचा नजारा पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे. याशिवाय घराच्या आसपासही बरीच मोकळी जागा आहे. ‘आईबाबांचं घर’ असं म्हणत अजय पूरकर यांनी घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘अजय अरुंधती अशोक पुरकर’ अशी त्यांच्या घरावर पाटी आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला लॉटरी; अ‍ॅमेझॉनसह मिळाल्या २० ब्रँडच्या ऑफर

अजय पूरकर यांनी हे घर चाहत्यांसाठी खुलं केलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अजय यांच्या घराचं बुकिंग करुन चाहत्यांना त्यांचा वीकेंड सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात साजरा करता येणार आहे. अजय यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत घराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawankhind fame ajay purkar shared video of house near vishalgad fort kak