अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच प्रियाने नुकत्याच शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंनी लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक

प्रियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत उमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया व उमेशच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. तर दोघेही मागच्या १८ वर्षांपासून एकत्र आहेत. “१८ वर्षे प्रेमात आणि १२ वर्षांचा संसार!” असं कॅप्शन प्रियाने फोटोंना दिलं आहे. हे फोटो तिने ऑस्ट्रेलियातील ब्लू माउंटनमधून शेअर केले आहेत. एका फोटोत प्रिया व उमेश एकमेकांना लिपकिस करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते एकमेकांना मिठीत घेऊन पोज देत आहेत.

प्रिया व उमेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. ते ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी परदेशात गेले आहेत. दरम्यान, आज दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे. प्रियाने शेअर केलेल्या या फोटोवर प्रसाद ओक, तेजस्विनी पंडित यांच्याबरोबरच चाहत्यांनीही कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat umesh kamat anniversary shared romantic photos from australia hrc