रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने गेले दीड दोन महिने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. तर आता त्याच प्रेक्षकांसाठी रितेश आणि जिनिलीयाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक खास सरप्राईज आणलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला; किंबहुना अजूनही प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ७० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल रितेश-जिनिलीयाने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली.

हेही वाचा : “दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती…”; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख ट्रोल

या चित्रपटाचा एक पोस्टर शेअर करत त्या दोघांनी सांगितलं की, तुमचा व्हॅलेंटाईन डे अधिक स्पेशल बनवण्यासाठी १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ‘वेड’ सिनेमा ९९ रुपयांत महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येईल. त्यामुळे ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिनिलीया आणि रितेश प्रेक्षकांचा व्हॅलेंटाईन वीक स्पेशल बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia deshmukh gave special valentine gift to audience rnv