Video : …अन् प्रेक्षकांच्या गर्दीत सचिन पिळगावकर यांनी गायलं “बडे अच्छे लगते है” गाणं; व्हिडीओ शेअर करत म्हणाले “आजची पिढी…”

सचिन पिळगावकर यांनी गायलं “बडे अच्छे लगते है” गाणं, व्हिडीओ व्हायरल

sachin pilgaonkar video
सचिन पिळगावकर यांनी गायलं "बडे अच्छे लगते है". (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. मराठीप्रमाणेच सचिन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘बालिका वधू’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

‘बालिका वधू’ चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटातील “बडे अच्छे लगते है” हे गाणं आजंही कित्येकांच्या ओठी असतं. सचिन पिळगावकर यांनी नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या गर्दीत हे गाणं गायलं. याचा व्हिडीओ सचिन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा>> Video : “माझ्या वडिलांनी माझे नाव…” सचिन पिळगावकरांच्या नावाचं आर.डी.बर्मन यांच्याशी आहे खास कनेक्शन, वाचा संपूर्ण किस्सा

सचिन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या गर्दीत मंचावर उभं राहून “बडे अच्छे लगते है” हे गाणं ते गाताना दिसत आहे. त्यांच्याबरोबर प्रेक्षकांनीही या गाण्यावर ताल धरलेला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “आजची पिढीदेखील या गाण्याशी कनेक्ट होत आहे, हे पाहून आनंद होतोय” असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> सिद्धार्थ जाधवकडून अशोक सराफ यांचा ‘द्रोणाचार्य’ म्हणून उल्लेख, पुरस्कार सोहळ्यातील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला “त्यांच्या पायाशी…”

सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘महागुरू’ अशी ओळख मिळवणाऱ्या सचिन यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 13:11 IST
Next Story
शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…
Exit mobile version