आजकाल कलाकार मंडळी जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ आणि आपल्या कामाच्या संदर्भातील नवनवीन अपडेट सोशल मीडियाद्वारे कलाकार चाहत्यांना देत असतात. अनेकदा ट्रोलही होतात. पण बरेच कलाकार याकडे दुर्लक्ष करतात तर काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. सध्या अभिनेत्री सखी गोखले व अभिनेता आशय कुलकर्णीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलीकडेच सखी गोखलेने आशय कुलकर्णीसह केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “पावसाळा, त्यात शहरातील रिकामे रस्ते, त्यामध्ये वेड्या मित्राची सोबत आणि मग थोडसं झुबी डूबी”, असं कॅप्शन लिहित सखीने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून नेटकरी दोघांचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेने दिला होता नकार पण…; अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या व्हिडीओत, २००९ साली प्रदर्शित झालेला आमिर खान व करीना कपूरचा ‘थ्री इडियट’ चित्रपटातील ‘झुबी डूबी’ गाण्यावर सखी व आशयने डान्स केला आहे. भर रस्त्यात दोघं डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत.

सखी व आशयचा हा डान्स व्हिडीओ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कौतुक केलं आहे. “मला वाटलं हा सुव्रत आहे. पण डान्स छान होता”, “आशय आणि सुव्रत दोघेपण सारखेच दिसतात मला,” “सुव्रत जळाला असेल”, “छान”, “मस्त”, “सुपर क्यूट”, “व्वा”, “भारी”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सखी व आशयच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – १७ वर्षांचा जुना नियम यंदा ‘बिग बॉस ओटीटी ३’ने तोडला; स्पर्धकांना दिले पर्सनल फोन अन्…; जाणून घ्या नवा ट्विस्ट

दरम्यान, सखी व आशयच्या या ‘झुबी डुबी’ डान्स व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं असून अजूनही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.