प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अशाच एका चाहत्याने एक शक्कल लढवली आहे.
गौतमी पाटीलचे पुणे सोलापूर परिसरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. अशातच पुणे सोलापूर मार्गावर टेंभुर्णी गावात हॉटेल ‘सुमन’ या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे या हॉटेलचे मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेलचे उदघाटन केले. इतकंच नव्हे तर गौतमीच्या नावाने त्याने थाळीदेखील सुरु केली आहे. गौतमी पाटीलची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता लक्षात घेता त्याने मालकांनी ही शक्कल लढवली आहे.
बहुचर्चित ‘ब्लॅक पँथर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
गौतमीच्या नावाची थाळी शाकाहारी असून तिची किंमत २४० रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे आता गौतमीचे चाहते तसेच त्या मार्गावरून जाणारे अनेकजण या थाळीचा आस्वाद घेतील. लावणीच्या कार्यक्रमांच्याबरोबरीने ती लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. अवघ्या ५०० रुपयांच्या मानधनावर सुरु झालेला गौतमीचा प्रवास आज लाखो रुपयांचा व्यवसाय ठरला आहे.