बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता सतत चर्चेत असतात. तसंच त्यांची मुलगी मसाबा पण कोणत्या न कोणत्या कारणांमूळे सतत चर्चेत असते. मसाबा गुप्ता एक फॅशन डिझाइनर आहे. मसाबा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि आपल्या कामाबद्दल आणि पर्सनल आयुष्याबद्दल नेटकऱ्यांना सांगत असते.

मसाबा गुप्ताचे तिच्या आईशी, नीना गुप्ताशी, खूप छान बॉंडिंग आहे. या गोष्टीचा अंदाज आपण तिच्या सोशल मीडियावरील  फोटो आणि व्हिडीओवरून लाऊ शकतो. मसाबा आणि नीना गुप्ता दोघीही एकमेकांचे फोटो व पोस्टवर कमेंट्स करताना दिसतात. मसाबाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हयरल होताना दिसत आहे. मसाबाच्या या फोटोवर नेटकऱ्यां बरोबरच तिच्या आईची म्हणजे नीन गुप्ताची कमेंट सगळ्यांचे लक्षवेधून घेणारी ठरली आहे.

नीना गुप्ता यांची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; लेहेंगा व आईच्या दागिन्यांवर खिळल्या नजरा

मसाबाने तिच्या लहानपणीचा एक गोड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमधे तिने छोटासा फ्रॉक परिधान केला आहे. या फोटो कडे बघून अस वाटत की मसाबा काही महिन्याचीच असेल. मसाबाने शेअर केलेल्या या फोटो खाली तिने “मी या आयुष्याला मिस करते आहे, ज्यात मला डाएट काय असत ते माहिती नव्हते आणि कोणाला काही दिसले तरी काहीच फरक पडत नव्हता.” असे कॅप्शन दिले आहे.

मसाबाने शेअर केलेल्या तिच्या लहानपणीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होतोय. मसाबाच्या बऱ्याच फॅन्सनी यावर कमेंट देखील केली आहे. मसाबाच्या बऱ्याच फॅन्सनी यावर कमेंट देखील केली आहे. मात्र या कमेंट्समध्ये मसाबाच्या आईची, अभिनेत्री नीना गुप्ता यांची कमेंट सगळ्यांचे लक्षवेधून घेणारी होती.

मसाबाच्या या फोटोवर नीना गुप्ता यांनी “कुठे आहे ती मुलगी ?” असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर मसाबाने कमेंटमध्ये एक छानस उत्तर दिले. ती म्हणाली “एंटरप्रीनियरशीप करण्यात बिझी आहे.” या कमेंटकडे बघून हे पक्क होत की बॉंडिंग असावी तर अशी.

photo-Masaba Gupta Instagram

“मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

दरम्यान नीना गुप्ता यांनी त्यांच आत्मचरित्र ”सच कहूं तो’ प्रकाशित केलं असून या पुस्तकात नीना गुप्ता यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केलाय. यानंतर  मुलगी मसाबा गुप्ताने नीना गुप्ता यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.