scorecardresearch

नीना गुप्ता यांची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; लेहेंगा व आईच्या दागिन्यांवर खिळल्या नजरा

Masaba gupta married to Satyadeep Misra: नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता हिने घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर आपल्या बॉयफ्रेंडसह लग्न केले आहे. मसाबाच्या लग्नाचा पहिला फोटो पाहिलात का?

Neena Gupta Daughter Designer Masaba Gets Married To Boyfriend Satyadeep Misra After First Divorce Masaba Wedding lehenga
नीना गुप्ता यांची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात (फोटो: इंस्टाग्राम)

Masaba gupta married to Satyadeep Misra: बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने आज २७ जानेवारीला आपल्या बॉयफ्रेंडसह लग्नगाठ बांधली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबाने आपल्या लग्नाचे दोन फोटो शेअर करून इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. मसाबा गुप्ता व सत्यदीप मिश्रा यांच्या लग्नाच्या फोटोवर काहीच वेळात लाखो लाईक्स मिळाले आहेत.

३३ वर्षीय मसाबाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २०१५- २०१९ मध्ये मधू मंटेनासह नात्यानंतर या जोडीत फूट पडली होती. मसाबाच्या दुसऱ्या लग्नाची माहिती तिच्या चाहत्यांसमोर अचानकच आली. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज मी माझ्या प्रेमासह लग्न केले आहे, येणारे आयुष्य प्रेम, शांती, स्थैर्य व सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर हसू घेऊन येईल. आपलं आयुष्य मस्त असणार आहे. आणि तू मला कॅप्शन लिहायला दिलंस यासाठी आभार”.

मसाबा गुप्ताच्या दुसऱ्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्सची हजेरी; अभिनेत्रीने शेअर केलेला Family Photo पाहिलात का?

मसाबाने आपल्या स्वतःच्या कलेक्शनमधील एका सुंदर लेहेंग्यात आज सात फेरे घेतले. पेस्टल बेबी पिंक शेडमधील लेहेंगा आणि त्यावर आई, नीना गुप्ता यांचे दागिने घालून मसाबा अत्यंत सुंदर दिसत होती. सत्यदीप मिश्रा म्हणजेच नवरदेवाने सुद्धा साजेसा पेस्टल कुर्ता घातला होता. यावेळी मसाबाने केसाला लावलेल्या चंद्राच्या क्लिपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मसाबा गुप्ता वेडिंग लेहेंगा

“मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

दरम्यान, मसाबा गुप्ता हे फॅशन इंडस्ट्रीत गाजलेले नाव आहे. अलीकडेच मसाबा मसाबा या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने अभिनयातही पदार्पण केले आहे. नीना गुप्ता यांच्यासह असलेलं नातं व फॅशन इंडस्ट्रीतील मेहनतीवर आधारित मसाबा मसाबा सीरीज नेटफ्लिसवर बरीच चर्चेत आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:50 IST
ताज्या बातम्या