scorecardresearch

“मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

मसाबा ही नीना गुप्ता व दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.

masaba gupta satyadeep misra wedding neena gupta
मसाबाच्या लग्नाला विवियन रिचर्ड्स यांनी हजेरी लावली होती. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने आज अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. सत्यदीप व मसाबा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. नीना व मसाबा दोघीही या लग्नातील फोटो शेअर करत आहेत.

लेक मसाबाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता भावूक; फोटो शेअर करत म्हणाल्या…

मसाबा ही नीना गुप्ता व दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना व विवियन यांचं अफेअर होतं, रिलेशनशिपमध्ये असतानाच गरोदर राहिलेल्या नीना गुप्ता यांनी लग्न न करता मुलीला जन्म दिला होता. तर, विवियन रिचर्ड्स आधीपासूनच विवाहित होते. दरम्यान, नीना गुप्ता यांनी लग्न केलं असून त्यांच्या पतीचं नाव विवेक मेहरा आहे.

मसाबा गुप्ताने अदिती राव हैदरीच्या पहिल्या पतीशी केलंय दुसरं लग्न; जाणून घ्या कोण आहे सत्यदीप मिश्रा

मसाबाच्या दुसऱ्या लग्नात नवविवाहित दाम्पत्यासह नीना गुप्ता व त्यांचे पती, विवियन रिचर्ड्स, सत्यदीपची आई व बहीण उपस्थित होते. या सर्वांचा एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा आहे. “मुलगी, नवीन मुलगा, मुलाची आई, मुलाची बहीण, मुलीचे वडील, मी आणि माझा नवरा”, असं कॅप्शन देत त्यांनी फॅमिली फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, मसाबा आणि सत्यदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं, पण दोघांचा काही वर्षांनी घटस्फोट झाला, त्यानंतर ती सत्यदीप मिश्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. आता दोघांनी लग्न करत या नवी इनिंग सुरू केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:48 IST