अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो . मिलिंद सोमण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. करोनातून बरा झाल्यानंतरही मिलिंद फिटनेसकडे लक्ष देतोय. नुकताच त्याने एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंदने त्याने केलेल्या एका निश्चयाबद्दल सांगितलं आहे. मात्र मिलिंदच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिलिंद सोमणने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो एका कलिंगडाच्या मदतीने व्यायाम करताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत तो कॅप्शनमध्ये म्हणालाय, ” रविवार हा आता ‘नो फोन डे’ म्हणून ठरवण्यात आलाय. कोणत्याही गॅझेटशिवाय 36 घालवल्याने अगदी रिफ्रेश आणि तणावमुक्त वाटतंय. तणावाचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे ताण-तणाव देणाऱ्या अनावश्यक गोष्टींपासून दूर रहा. ताण-तणावाचं नियोजन करण्यासोबतच थोडासा व्यायाम आणि साधा आहार आपल्याला निरोगी राहण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. ” मिलिंदने त्याच्या कॅप्शनमधून चाहत्यांना तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी महत्वाची टीप दिलीयं.

मलिंद सोमणच्या या व्हि़डीओला त्याच्या चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. मात्र काही चाहत्यांनी मिलिंदला त्याच्या ‘नो फोन डे’ च्या निश्चयावरून सवाल उपस्थित केले आहेत. चाहत्यांच्या या प्रश्नाला मिलिंदनेही उत्तर दिलंय. एका युजरने प्रश्न विचारलाय, ” सॉरी सर मी तुमचा मोठा चाहता आहे. पण तरी तुम्हाला एक प्रश्न होता कोणत्याही गॅझेटशिवाय हा व्हिडीओ तुम्ही कसा शूट केला?” मिलिंदने युजरला उत्तर देत म्हंटलंय, “तुझ्या जगात अजूनही रविवार आहे का?” कारण मुळात मिलिंदने हा व्हिडीओ सोमवारी शेअर केलाय.

(photo-instagram@milindsoman)

 

 

तर दुसऱा युजर म्हणालाय, ” सर जर नो फोन डे आहे तर शूट कसं केलं?” यावर मिलिंदने हटके उत्तर दिलंय , “आज सोमवर आहे, मी कुठेय?” मिलिंदच्या या व्हिडीओमुळे अनेक जण गोंधळात पडले आहेत. जर नो फोन डे होता तर व्हिडीओ कसा शूट केला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचं उत्तर त्याच्या काही चाहत्यांनीच दिलंय. “मिलिंदने रविवारी फोनला हातही लावलेला नाही. त्याने सोमवारी हा व्हिडीओ शेअर करत रविवारबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालाय.” असं काही चाहत्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान मिलिंद सोमण सोशल मीडियावर फिटनेसच्या संदर्भातील विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रेरित करत असतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind soman share no phone day video fan asked how you shoot this milind hilarious reply kpw