'पुष्पा २' च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक | most awaited film allu arjun starrer pushpa sequel shooting about to start from october | Loksatta

‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक

अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून लवकरच पुष्पाचा नवीन लूक समोर येईल.

‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक
पुष्पा द रूल | pushpa the rule

२०२१ या वर्षी केवळ एकाच चित्रपटाने सारं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं, तो चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर लोकांनी या चित्रपटासाठी तोबा गर्दी केली. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली, त्यावर कित्येक रील आणि मीम्स व्हायरल झाले. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहादचा अभिनय सगळंच लोकांना प्रचंड आवडलं आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागासाठी आस लावून बसले आहेत.

नुकताच या चित्रपटाचा शुभारंभ झाला होता आणि ते पाहून प्रेक्षकही चांगलेच उत्सुक झाले होते. आता त्यांच्या उत्सुकतेत आणखीन भर पडणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ‘पुष्पा द रूल’ या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून लवकरच पुष्पाचा नवीन लूक लोकांना बघायला मिळू शकतो.

आणखी वाचा : सैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”

नुकताच अल्लू अर्जुनला साऊथ इंडियन इंटरनॅशनल चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘पुष्पा’साठी पुरस्कार दिला गेला. या कार्यक्रमात अल्लूने त्याच्या ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या काही स्टेप्स करून दाखवल्या. पुष्पाच्या या पुढील भागात कथा नेमकं काय वळण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

अल्लू अर्जुनच्या काही चाहत्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. पण ते अधिकृत फोटो नसल्याचं स्पष्ट झालं असून अल्लू अर्जुनचा लूक अजून कुठेच दाखवला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचा चित्रीकरण सुरू होऊन हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानानेही काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल खुलासा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला बाहुबलीच्या…”

संबंधित बातम्या

“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्युरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल निघाला हॉलिवूडला! २०२३ मध्ये येणाऱ्या नव्या सिनेमाची घोषणा, पाहा Video
विश्लेषण: नारळ काढण्यासाठी प्रशिक्षणाची गरज? कोकणातील दुर्लक्षित कल्पवृक्षाबाबत ही समस्या का उद्भवते?
‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
“कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा ‘व्हल्गर’ उल्लेख केल्यानंतर चित्रपटातील अभिनेता संतप्त