छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय सूत्रसंचालक आणि अभिनता रणविजय सिंहच्या घरी लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोमवारी म्हणजे ‘१२ जुलै’रोजी रणविजयची पत्नी प्रियांका वोहराने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्याची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. ‘एमटीव्ही रोडीज्’ कार्यक्रमाचा जज रणविजय आणि पत्नी प्रियांका सहा वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकले असून त्यांना एक मोठी मुलगी देखील आहे.
रणविजय सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. रणविजयने, एक लाल रंगाची लहान मुलाची जर्सी आणि शूजचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्या पोस्टखाली ‘#सत्नामवाहेगुरु’ असे कॅप्शन देखील लिहलं आहे.
रणविजयच्या या पोस्टला तुफान लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांबरोबरच कला क्षेत्रातील त्याच्या मित्रांनी देखील पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे.
एमटीव्ही रोडीज्’च्या टीममधून नेहा धुपिया, निखील चिनापा, वरूण सूद, दिव्या अग्रवाल यांनी रणविजय आणि प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत. रणविजय आणि प्रियांकाची भेट एका कॉमन फ्रेंडमूळे झाली होती. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी २०१५ सालामध्ये ‘केनिया’मध्ये लग्न केले. रणविजय आणि प्रियांका यांच्या मोठ्या मुलीचे ‘कायनात’ असून ती ४ वर्षांची आहे. आत्ता प्रियांकाला दुसरा मुलगा झाला आहे. एका मुलाखतीत रणविजयने वडिल झाल्यावर मी अजून जबाबदार झालो आहे असे सांगितले होते.
दरम्यान रणविजयच्या कामा बद्दल बोलायचे झाले तर रणविजय नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’या वेब सीरीजमध्ये प्रमुख भुमिकेत झळकला होता.