दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला होता. पण घटस्फोटानंतर त्या दोघांनी त्यांच्या प्रोफेशनल लाईफवर लक्ष दिले. आता नागा चैतन्यविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, नागा चैतन्स सध्या दाक्षिणात्य अभिनेता शोभिता धुलीपासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना एकत्र हैद्राबादमध्ये स्पॉट करण्यात आले. हैद्राबाद येथे नागाला नवा फ्लॅट मिळणार आहे. त्या फ्लॅटचं सध्या काम सुरू असून तो पाहण्यासाठी नागा आणि शोभिता दोघे गेले होते. शोभिता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ या चित्रपटात होती. एवढच काय तर नागा चैतन्य आणि शोभिताला हैद्राबादच्या हॉटेलमध्ये अनेकदा स्पॉट केलं आहे.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

समांथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या ४ वर्षांनी दोघांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी फार धक्कादायक होता. सोशल मीडियावर आजही दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. नागा चैतन्य आता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर समंथा ‘शंकुतलम’ आणि ‘यशोदा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya dating major actress sobhita dhulipala ex wife samantha ruth prabhu dcp