दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी ९ जूनला थाटामाटात लग्न केलं होतं आणि त्यानंतर ४ महिन्यातच दोघंही आई- बाबा झाले आहेत. नयनतारा आणि विग्नेश यांना जुळी मुलं झाली असून त्यांनी त्यांची नावंही हटके ठेवली आहेत. विग्नेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या मुलांच्या नावांची चर्चा होताना दिसत आहे. खासकरून या नावांचा नेमका अर्थ काय याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
लग्नानंतर केवळ ४ महिन्यांनतर नयनतारा आणि विग्नेश यांच्या घरात छोट्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर त्यांनी याची माहिती देत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाच्या ४ महिन्यांनंतर नयनतारा आई कशी काय झाली हा प्रश्नही अनेकांना सतावत होता. पण आता नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या बाळांची नावं उईर आणि उलगम अशी ठेवली आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. त्यानंतर या नावाचा अर्थ काय याची चर्चा सुरू झाली होती.
आणखी वाचा- लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन
नयनतारा आणि विग्नेश यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावं उईर आणि उलगम अशी ठेवली आहे. ही दोन्ही तमिळ नावं असून याचा अर्थही खूप खास आहे. यातील उईरचा अर्थ आहे लाइफ म्हणजे जीवन तर उलगमचा अर्थ वर्ल्ड म्हणजे जग असा आहे. नयनतारा आणि विग्नेश यांच्यावर देशभरातील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या फोटोंवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान विग्नेश शिवनने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी त्या बाळांच्या पायांचे चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते दोघेही त्यांच्या पायांना प्रेमाने किस करताना दिसत आहेत. तर एका फोटोत नयनतारा ही बाळाच्या पायाकडे बघत गोड हसताना दिसत आहे. “नयन आणि मी आज आई- बाबा झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. उईर आणि उलगम” असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.