अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खानने तो या पार्टीचा भाग असल्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान आर्यन खानवर अद्याप कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. सध्या एनसीबीच्या कार्यालयात आर्यन खानची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ड्रग्स क्रूझवर कसे पोहोचले?

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूझवर लपवून ड्रग्स नेण्यात आले होते. अटक केलेल्या काही जणांनी कॉलरमध्ये, पँटच्या शिलाईमध्ये तर काहींनी अंर्तवस्त्रामध्ये ड्रग्स लपवले होते. विशेष म्हणजे काही महिलांनी तर पर्सच्या हँडलमध्येही ड्रग्स लपवल्याची माहिती समोर येत आहे. सध्या एनसीबीकडून ही सर्व माहिती खरी की खोटी याचा तपास सुरु आहे. तसेच एनसीबी कार्यालयात या आठ जणांवर प्रश्नोत्तरांची सरबत्तीही सुरु आहे. आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबीची टीम या सर्वांची कसून चौकशी करत आहे.

एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ८ जणांची नावे

  1. आर्यन खान
  2. अरबाज मर्चेंट
  3. मुनमुन धमेचा
  4. नुपूर सारिका
  5. इसमीत सिंह
  6. मोहक जसवाल
  7. विक्रांत छोकर
  8. गोमित चोप्रा

सध्या कोणाकोणाची चौकशी सुरु?

आर्यन खान हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मोठा मुलगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मी फक्त पाहुणा म्हणून क्रूझवर गेलो होता, अशी माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली आहे. अरबाज मर्चेंट हा आर्यनला पार्टीसाठी घेऊन गेला होता. तर मोहक, नुपूर आणि गोमित हे सर्वजण दिल्लीचे रहिवासी आहेत. मोहक ही एक फॅशन डिझायनर आहे तर नुपूर देखील या व्यवसायाशी संबंधित आहे. नुपूर आणि गोमित एकत्र मुंबईला आले. गोमित हेअर स्टायलिश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb detains 8 people caught on cruise in drug case with aryan khan know the details nrp