“ऋषीजी गेल्यानंतर तुम्ही खूप फिरत आहात”; नीतू कपूर यांच्या ‘या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

neetu kapoor troll
नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या आलियाच्या प्रेग्नेसीमुळे चर्चेत होत्या. तर आता नीतू कपूर या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

नीतू यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केला आहे. या व्हिडीओत नीतू या मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. यावेळी फोटोग्राफरला नीतू यांनी त्या फोटोग्राफर्सला विचारलं की तुम्ही रात्री झोपतं नाही का? त्यावर फोटोग्राफ त्यांना विचारतात की लंडनला जात आहात? हो असं उत्तर नीतू देतात. तर नंतर फोटोग्राफर विचारतात सुनेला भेटायला? तर नीतू म्हणाल्या, नाही, माझी मुलगी आहे तिथे तिलाच भेटायला जातं आहे. तर सूनेला नाही भेटणार असा प्रश्न विचारता नीतू यांनी सांगितले की सून शूटिंगला कुठे गेली आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात होणार विजय सेतुपतीची एण्ट्री, ‘या’ अभिनेत्याची घेणार जागा

पाहा व्हिडीओ

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी नीतू यांचा हा अंदाज आवडला नाही. त्यांनी नीतू यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “असं वाटतंय की ऋषी कपूर यांनी मॅडमला लाइम लाइटमध्ये येऊ दिलं नाही. आता इच्छा पूर्ण करत आहेत. पितृसत्ताक विचार प्रत्येक समाज वर्गात आहेत.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ऋषीजी असताना या बोलू शकत नव्हत्या.” तिसरा नेटकरी म्हणाला, “ऋषीजी काय गेले…ही चित्रपटसृष्टीत परत आली आणि तरुणही झाली.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “नीतूजी तुम्ही खूप फिरत आहात. ऋषी सरांसोबत तर कधी येत नव्हत्या आणि आता फिरत आहात”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नीतू यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : “संजय राऊत यांची कॉमेंट्री…”, आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत

नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले. नीतू आणि ऋषी कपूर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होती. ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर नीतू यांनी चित्रपटांपासून स्वत:ला लांब करत कुटुंब आणि मुलांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले जाते. जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली तेव्हा त्या काही प्रोजेक्ट्समध्ये दिसल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neetu kapoor badly trolled for living her life after rishi kapoors demise dcp

Next Story
कपाळाला टिकली, हातात बांगड्या; उर्फी जावेदचा ट्रेडिशनल लुक चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी