मराठी अभिनेता प्रसाद ओक हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रसाद सध्या धर्मवीर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान प्रसाद अनेकवेळा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहवास लाभला. तर एकनाथ शिंदे यांच्यांसमोर चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसादने सांगितली आहे.

आणखी वाचा : ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

प्रसादला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रीकरण करतना त्याच्यावर दडपण होतं का? असा प्रश्न विचारला असता प्रसाद म्हणाला, “एक गोष्ट इथे आवर्जून सांगाविशी वाटते, ती म्हणजे जेव्हा जेव्हा मी आनंद दिघे साहेबांच्या गेटअपमध्ये समोर यायचो, तेव्हा शिंदेसाहेब खुर्चीतून उठून उभे राहायचे. मी त्यांना म्हणायचोही, की तुम्ही उभे राहू नका; पण जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात तोपर्यंत ते शक्य नाही, प्रसाद ओक म्हणून समोर असाल, तेव्हा मी शेजारी बसेन, असे ते अतिशय विनम्रतेने सांगायचे.”

आणखी वाचा : “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा ‘तो’ सीन व्हायरल

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

पाहा लोकसत्ताचा डिजीटल अड्डा –

आणखी वाचा : आनंद दिघे यांच्या वाहनाला नवसंजीवनी

पुढे प्रसाद म्हणाला, “त्यांच्यात असलेली ही आदराची भावना सतत दिसायची. ते सेटवर यायचे तेव्हाच आमची भेट घडायची, चित्रीकरणाची गडबड सतत असल्यानं माझ्या प्रसंगाचं चित्रीकरण करण्यासाठी जावं लागायचं.’