देशातील पहिला पुरुष सुपर मॉडेल म्हणजेच मिलिंद सोमण. कधी मॉडेलिंग करणार असा विचार सुद्धा न केलेला मिलिंद सुपर मॉडेल झाला. आजा मॉडेल सोबतच तो एक फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. मिलिंद बऱ्याचदा सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. मिलिंदने काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत एक महिला पुशअप करताना दिसतं आहे. त्या व्हिडीओमुळे मिलिंद सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत एक महिला पुशअप करताना दिसत आहे. सगळ्यात लक्ष वेधी बाब म्हणजे ही महिला साडी परिधान केली असून ती पुशअप करत आहे. ही महिला असे का करत आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी मिलिंदने सोशल मीडिया पोस्टवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने ‘Pushups for selfie!’ मिलिंदने त्याच्यासोबत सेल्फी काढाणाऱ्यांसाठी एक अट घातली होती. जर तुम्हाला मिलिंद सोमणसोबत फोटो काढायचा असेल तर तुम्हाला पुशअप मारावे लागणार असे म्हटले होते. या महिलेने सेल्फी काढण्यासाठी मिलिंदची ही अट मान्य केली आहे. त्याचा हा व्हिडीओ मिलिंदने शेअर केला आहे. तर व्हिडीओ शेअर करत त्याने त्या महिलेची स्तुती केली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी मिलिंदची स्तुती केली की तो लोकांना फिट राहण्यासाठी त्यांना हिंमत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे काही नेटकऱ्यांना ही गोष्ट पटलेली नाही. एक नेटकरी म्हणाला, “तुझा हेतू चांगला आहे पण बिचारी काकु.” दुसरा नेटकरी म्हणाला, “फिट राहण्यासाठी पुशअप करणे निश्चितच चांगले आहे, पण तू एखाद्या महिलेला तुझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सगळ्यांसमोर रस्त्यावर पुशअप करायला सांगतो हे चुकीच आहे. यात चांगल काय आहे ते सांग.” तिसरा नेटकरी म्हणाला, “त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे.”