दाक्षिणात्य अभिनेता राम चरण व त्याची पत्नी उपासना काही दिवसांपूर्वीच आई-बाबा झाले. कोनिडेला कुटुंबीय घरात चिमुकली परी आल्याने आनंदी असतानाच एक वाईट बातमी आहे. राम चरणची बहीण निहारिका कोनिडेला पतीपासून विभक्त होत आहे. निहारिका तिचा पती चैतन्य जोन्नालगड्डापासून वेगळी राहत आहे. तसेच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. खुद्द निहारिकाने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्राचं राजकारण पण फिकं…”, उर्फी जावेदचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले…

निहारिका कोनिडेलाने कुकटपल्ली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यामध्ये तिने पती चैतन्य जोन्नालागड्डापासून घटस्फोट हवा असल्याचं म्हटलंय. दोघांनी सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं कळतंय. चैतन्य व निहारिकाने डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी मतभेदांमुळे लग्नाच्या अडीच वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

निहारिकाने यावर्षी एप्रिलमध्ये चैतन्यबरोबरचे लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले होते. त्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण, तिने याबद्दल कोणतंही भाष्य केलं नव्हतं. याशिवाय तिचा भाऊ व अभिनेता वरुण तेजच्या लग्नातही ती एकटीच आली होती.

निहारिका ही अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू आणि पद्मजा यांची मुलगी आहे. ती चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची पुतणी आहे. वरुण तेज हा तिचा भाऊ आहे आणि ती राम चरण, साई धरम तेज, वैष्णव तेज आणि अल्लू अर्जुन यांची चुलत बहीण आहे. निहारिका सध्या तिच्या अभिनय करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच ती वेब ड्रामाची निर्मितीही करत आहे. लवकरच ती डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘डेड पिक्सेल्स’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Niharika konidela filed divorce from husband chaitanya jonnalagadda shared post on social media hrc