बिग बॉस सीजन १४ मध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेली स्पर्धक निक्की तांबोळीचं नशीब या शो नंतर रातोरात पालटलं. बिग बॉस १४ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर तिच्यासमोर नव-नव्या प्रोजेक्ट्सच्या रांगा लागल्या आहेत. या शो मधून बाहेर पडल्यानंतर ती लागोपाठ नवे नव्या सॉंगमध्ये झळकताना दिसतेय. नुकतंच पंजाबी सिंगर मिलिंद गाबासोबत तिचं ‘शांती’ हे नवं सॉंग रिलीज झालंय. या गाण्यात दोघेही धमाकेदार डान्स करताना दिसून आले. निक्की तांबोळीचा अत्यंत हॉट अंदाज गाण्यात पहायला मिळत आहे जो चाहत्यांना खूपच आवडलाय. टी सीरिजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेलं हे गाणं युट्युबवर रिलीज झालंय. या म्युझिक व्हिडीओनं रिलीज होताच धमाल केलीय. सॉंग आऊट झाल्यानंतर अवघ्या चार तासातच गाण्यानं १.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

बिग बॉस १४ मधून बाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळीचं लागोपाठ हे तिसरं सॉंग रिलीज करण्यात आलंय. याआधी पंजाबी सिंगर जस जैलदार सोबत तिचं ‘कल्ला रह जाएगा’ हे गाणं रिलीज झालं होतं. त्यानंतर लागोपाठ टोनी कक्कडसोबतचं ‘नंबर लिख’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. त्यापाठोपाठ आज रिलीज झालेलं ‘शांती’ हे तिचं तिसरं सॉंग आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गाण्यात निक्की तांबोळीचा वेगळाच अंदाज दिसत आहे. निक्कीचा ग्लॅमरस अवतार सर्वांनाच खूप आवडला आहे. गाण्यात ती वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. या गाण्यात पंजाबी सिंगर मिलिंद गाबा निक्कीला ‘ तेरे बिना जिंदगी में शांती नहीं’, असं म्हणताना दिसून येतोय.

यूट्यूबवर हे रिलीज झाल्यानंतर निक्की तांबोळीने सुद्धा इन्स्टाग्राम अकाउंटवर हे गाणं शेअर केलं आहे. यासोबतच तिने लिहिलं, “सगळ्यात छोटा ट्रॅक…#Shanti अखेर रिलीज झालं…ट्यून करा.”

बिग बॉस १४ नंतर निक्कीने खतरो के खिलाडीमध्ये भाग घेतला. या शोसाठीची शूटिंग साऊथ आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये सुरूय. हा शो येत्या जुलै महिन्यापासून टेलीकास्ट होणारेय.