सध्या बॉलिवूडमध्ये गुप्तहेरांवर आधारित चित्रपटांचे पेव फुटलेले पहायला मिळत आहे. रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ आणि विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ या चित्रपटांबद्दल बॉलिवूडमध्ये सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत रणबीरचा स्टारडम वरचढ ठरणार की विद्याचा अभिनय याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र, विद्या बालनने रणबीर आणि माझ्या चित्रपटात कोणतीही स्पर्धा नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही चित्रपट आपापल्या पातळीवर उत्तम असल्यामुळे स्पर्धेचे कोणते कारणच नसल्याचे विद्याने म्हटले. येत्या ४ जुलै रोजी विद्याचा ‘बॉबी जासूस’ प्रदर्शित होणार असला, तरी रणबीरच्या ‘जग्गा जासूसच्या’ प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसूने केले असून चित्रपटात रणबीरच्या जोडील कतरिना असणार आहे. तर दुसरीकडे विद्यानेसुद्धा ‘बॉबी जासूससाठी’ बरीच मेहनत घेतल्याची चर्चा आहे. या चित्रपटातील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी विद्याने एक-दोन नव्हे तर तब्बल १००हून रूपे धारण केली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
‘बॉबी जासूस’ आणि ‘जग्गा जासूस’ यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही- विद्या बालन
सध्या बॉलिवूडमध्ये गुप्तहेरांवर आधारित चित्रपटांचे पेव फुटलेले पहायला मिळत आहे. रणबीर कपूरचा 'जग्गा जासूस' आणि विद्या बालनचा 'बॉबी जासूस' या चित्रपटांबद्दल बॉलिवूडमध्ये सध्या बरीच चर्चा रंगली आहे.

First published on: 28-05-2014 at 01:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No competition between bobby jasoos and ranbir kapoors jagga jasoos says vidya balan