मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. बॉलिवूडचा ऐतिहासिक चित्रपटांकडे बघायचा दृष्टिकोन तान्हाजीमुळे बदलला. आता ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. साऊथ सुपरस्टार प्रभास हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाविषयी एक खास अपडेट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशी चर्चा आहे की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित होऊ शकतो. आत्तातरी ३ ऑक्टोबर या तारखेला टिझर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल अधिकृत खुलासा अजून कुणीच केला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘आदिपुरुष’चा टिझर हा अत्यंत भव्य पद्धतीने अयोध्या येथे प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. प्रभू श्रीराम जन्मभूमी आणि नवरात्रीचं औचित्य साधून हा टिझर प्रदर्शित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर बेतलेला आहे असं या चित्रपटाच्या मेकर्सचं म्हणणं आहे. पूर्णपणे रामायण यात नसलं तरी त्यासदृश्य कथा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. या चित्रपटात क्रिती सनॉन ही जानकी भूमिकेतदिसणार आहे तर प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सैफ अली खान हा पुन्हा लंकेश या आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : रणबीर कपूरने हॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारली, जाणून घ्या कारण

‘तान्हाजी’नंतर ओम राऊतचा हा दुसरा बिग बजेट हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटासाठी तो आणि त्याची टीम गेली बरीच वर्षं मेहनत घेत आहेत. कोविडमुळे मध्यंतरी या चित्रपटाचं काम चांगलंच रखडलं होतं. आता मात्र हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून १२ जानेवारी २०२३ या दिवशी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हिंदी बरोबरच तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om rauts directorial most awaited film adipurush teaser date launch speculations avn